पशु किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यास सुरवात PDF अर्ज नमुना पहा : लाभार्थ्याला 1 लाख 60 हजार रुपये | Pashu kisan credit Card PDF Application Form

पशु किसान क्रेडिट कार्ड चा लाभ कसा मिळणार ? 

  • पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत एका गाईसाठी 12 हजार रुपये देण्यात येईल.
  • जर तुमच्याकडे म्हैस असेल तर प्रति म्हशीसाठी 14 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • दहा शेळ्यांच्या गटासाठी 20 हजार रुपये पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येईल.
  • पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतचा कर्जपुरवठा केला जाणार आहे. 

पशुपालक शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे गाई म्हशी शेळ्या किंवा मेंढ्या आहेत तसेच मत्स्य पालक शेतकऱ्यांसाठी देखील पशु किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा ? (Pashu kisan credit Card PDF Application Form )पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा मराठी अर्ज नमुना डाऊनलोड करून तो अर्ज नमुना कुठे भरावा त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते या कर्जावरील व्याजदर फक्त 4 % एवढा आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कोण करू शकतो

  1. पशु किसान क्रेडिट कार्ड साठी भारतातील कुठलाही पशुपालक शेतकरी अर्ज करू शकतो.
  2. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचे शेत जमीन आहे व त्याकडे पशुधन उपलब्ध आहे.  जसे की गाय बकरी म्हशी मेंढ्या इत्यादी. 

PDF अर्ज नमुना येथे पहा

 पशु किसान क्रेडिट कार्ड  योजनेचा उद्देश

जनावरे आजारी पडल्यास त्यावर उपचार करण्यासाठी गरीब शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे वेळेवर जनावरांवर उपचार करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उपयोग होईल.

 पशुपालक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन शेतीसोबतच जोड व्यवसाय सुरू होऊन शेतकरी समृद्ध होईल.

 पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment