पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा पीडीएफ अर्ज नमुना कसा डाऊनलोड करायचा ?
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा पीडीएफ अर्ज नमुना येथे उपलब्ध आहे हा अर्ज नमुना घेऊन आपल्याजवळील बँक शाखेत जावे.
या ठिकाणी देण्यात आलेला पीडीएफ फॉर्म व्यवस्थित भरून आपल्या जवळील बँक शाखेमध्ये जमा करावा. सोबतच आपल्याकडे असलेली कागदपत्रे देखील फॉर्म सोबत व्यवस्थित जोडावी.
या अर्ज नमुन्यासोबत आपली कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा इत्यादी कागदपत्रे जोडावे.
बँकेमध्ये आपल्याकडे असलेल्या पशुधनाची माहिती उपलब्ध करून द्यावी. पशु किसान क्रेडिट कार्ड ही केंद्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. जर बँक अधिकारी आपणास कर्ज देण्यास मनाई करत असेल तर आपण आपल्या जवळील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता.
तालुका निहाय किंवा मंडळनिहाय पशुवैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासनाकडून नेमण्यात आलेले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे देखील आपण पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी माहिती घेऊ शकता.