ई-पीक पाहणी  विसरली ? सरकारी मदत मिळणार का ? ई पीक पाहणी यादी कुठे ? E pik Pahani App List

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.  ई-पीक पाहणी करण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंतची मदत वाढ देण्यात आली होती.

आज आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत

  1. ई-पीक पाहणी यादी कुठे ?
  2. ई-पीक पाहणी विसरली तर काय होणार ?
  3. ई-पीक पाहणी नाही केली तर मदत मिळणार का ?
  4. ई-पीक पाहणी नाही केली तर पिक विमा मिळणार का ?

 

ई-पीक पाहणी यादी कुठे ?

ई-पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्ही ई-पीक पाहणी ॲप  E pik Pahani App List डाऊनलोड करून त्यामध्ये तुमच्या ई-पीक पाहणीचे स्टेटस चेक करू शकता.

ई-पीक पाहणी यादी पाहण्यासाठी शासनाकडून पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर आपल्या गावातील ई-पीक पाहणी यादी तुम्ही पाहू शकता.  

ई-पीक पाहणी विसरली तर काय होणार ?

 जर तुमच्याकडून ई-पीक पाहणी  करणे विसरले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सातबारा वरील पीक पेऱ्याची नोंद कोरी ठेवण्यात येईल. आपल्या सातबारावर कोणते पिके आहेत त्याची नोंद करणे आवश्यक असते.

 जर ई-पीक पाहणी  केली नाही तर आपल्या सातबाऱ्यावरील पीक पेरा कोरा राहतो.

सातबाऱ्यावरील जुने रेकॉर्ड येथे पहा

ई-पीक पाहणी नाही केली तर मदत मिळणार का ?

शासकीय मदत मिळण्यासाठी यापूर्वी ई-पीक पाहणीची अट बंधनकारक करण्यात आली नव्हती.  वेळोवेळी शासनाकडून ईपीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तरी देखील खूप शेतकरी ई-पीक पाहणी करण्यापासून वंचित आहेत. याचे कारण बहुतेक शेतकऱ्यांकडे चांगला स्मार्टफोन नाही. गाव खेड्यामध्ये नेटवर्क देखील व्यवस्थित काही ठिकाणी येत नाही. तसेच  काही शेतकऱ्यांना स्मार्टफोन चालवणे देखील जमत नाही.

अशा परिस्थितीत जर काही शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी झाली नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारी मदतीपासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. 

ई-पीक पाहणी नाही केली तर पिक विमा मिळणार का ?

आतापर्यंतच्या आलेल्या शासन परिपत्रकामध्ये  किंवा शासन निर्णयामध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की जर ई-पीक पाहणी केली नाही तर सरकारी मदत मिळणार नाही. तसेच ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा मिळणार नाही असा उल्लेख  देखील कुठेही आढळून येत नाही.

सातबाऱ्यावरील जुने रेकॉर्ड येथे क्लिक करून पहा

Leave a Comment