ओबीसी विद्यार्थ्यांना प्रति वर्ष 60 हजार रु मिळणार : OBC Scholarship Apply

OBC Scholarship Apply : आता बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  वार्षिक साठ हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

 यासाठी 11 मार्च 2024 रोजी जीआर प्रकाशित करण्यात आला आहे.

 इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

 या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे नियम अटी आता आपण जाणून घेऊया.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना  पात्रता OBC Scholarship eligibility 

  • विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी व्यवसाय किंवा बिगर व्यावसायिक क्षेत्रात शिक्षण घेणार असेल तर त्यासाठी बारावी मध्ये किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • Scholarship  साठी  पात्र करताना इयत्ता बारावीची टक्केवारी विचारात घेतली जाईल. OBC Scholarship Apply
  • सदर योजनेत 70 टक्के जागा या व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल.
  •  इतर 30 टक्के जागा ह्या बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी दिल्या जातील. 
  • स्कॉलरशिप साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थी त्याचा अभ्यासक्रम असे वर्ष पूर्ण होईपर्यंत पात्र असेल. 
  •  परंतु प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक वर्षात किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

GR येथे डाऊनलोड करा

Leave a Comment