मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज, कागदपत्रे व पात्रता : Mukhyamantri Vayoshri Yojana online apply

Mukhyamantri Vayoshri Yojana online apply : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ

  • या योजनेतून फक्त एकदाच 3000 रुपये दिले जाणार आहे.
  • लाभार्थ्यांनी मिळालेल्या रकमेतून स्वतःसाठी सहाय्यभूत असणारी साधने किंवा उपकरणे खरेदी करावी.
  • या योजनेसाठी राज्य शासनाकडून 100% निधी वितरित केला जाईल.
  • थेट लाभ वितरण (D.B.T.)  प्रणाली द्वारे 3000 रुपयांच्या मर्यादित निधी वितरण केले जाईल.
  •  ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिराचे देखील आयोजन केले जाईल.

योजना GR येथे पहा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे  बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • स्वयंघोषणापत्र
  • शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे

अर्ज प्रक्रिया Mukhyamantri Vayoshri Yojana online apply

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून नवीन पोर्टल विकसित केले जाईल. या पोर्टलवर मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल.

योजनेसाठी पोर्टल तयार झाल्यावर या पेजवर त्याची माहिती दिली जाईल. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी ज्येष्ठ नागरिक असावा.
  • लाभार्थ्याचे 31-12-2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण झालेली असावी.
  • लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे.
  • बीपीएल राशन कार्ड किंवा जिल्हा प्राधिकरणाकडून कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र असावे. 
  • जर बीपीएल राशन कार्ड किंवा प्रमाणपत्र नसेल तर लाभार्थी शासनाच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभार्थी असावा.

योजनेची अंमलबजावणी

मुख्यमंत्री वयोश्री Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरील समाज कल्याण विभागाकडून नोडल एजन्सी नेमली जाणार आहे. 

नोडल एजन्सीची कामे

लाभार्थ्यांची नोंदणी करणे, कागदपत्र तपासणी करणे व निधी हस्तांतरण करणे इत्यादी कामे नोडल एजन्सी करणार आहे.

Leave a Comment