महिला योजना : शिलाई मशीन, पिठाची गिरणी अर्ज सुरु – 22 फेब्रुवारी अंतिम मुदत flour Mill and Sewing machine PDF

Flour Mill and Sewing machine PDF : प्रत्येक जिल्हा परिषदे कडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामध्ये दरवर्षी महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो.

सध्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पिठाची गिरणी व पिको फॉल मशीन साठी बुलढाणा जिल्ह्यातील अर्ज सुरू आहेत.

अर्ज करण्याचा कालावधी 

 • 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत

योजनेसाठी कोण पात्र आहेत

 • ग्रामीण भागातील महिला व मुली.
 • पिठाच्या गिरणीसाठी Flour Mill फक्त अपंग महिला व मुलींनाच अर्ज करता येईल.
 • पिको फॉल Sewing machine मशीनसाठी महिला व मुली दोन्ही अर्ज करू शकतात.

योजनेसाठी नियम व अटी

 • अर्जदार महिला किंवा मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे.
 • अर्जासोबत उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल. 
 • अर्जदार महिला किंवा मुलगी ही ग्रामीण भागातील असावी.
 • लाभार्थी चे वय किमान 17 व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे
 • यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
 • मुदतीत अर्ज सादर करावा.

PDF अर्ज नमुना

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 

 • अर्जदाराच्या वयाचा दाखला / TC
 • अर्जदाराचे किंवा त्याच्या पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड झेरॉक्स
 • आधार कार्ड सत्यप्रत
 • बँक पासबुक झेरॉक्स
 •  लाईट बिल

Leave a Comment