1500 रुपये भरून आवडेल तेथे कुठेही प्रवास : एस टी बस प्रवास योजना | MSRTC Transport service

MSRTC Transport service : मित्रांनो, सुट्टीमध्ये एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणारा प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

यामध्ये तुम्हाला पास काढता येतो. आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो. अगदी अंतरराज्य प्रवास सुद्धा.

  • कोणत्या पाससाठी किती पैसे भरावे लागतील? 
  • एसटीच्या कोण-कोणत्या बसेसमध्ये तुम्हाला प्रवास करता येईल? 
  • पासची मुदत किती असेल? MSRTC Transport service

मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास ही योजना सन 1988 पासून प्रवासासाठी राबवित आहे. 

सर्वप्रथम पास संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पाससाठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती पाहू 

या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास दिला जातो. 

पास काढायचा असल्यास एसटी आगारामध्ये तुम्हाला खिडकीवर जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून पास काढता येतो.

कोणत्या पास साठी किती पैसे लागतील 

येथे पहा 

आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल. 

साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बस साठी, जलद बस, रातराणी, शहरी, यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठीसुद्धा वापरले जाऊ शकतात. 

निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही. 

जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बससेवेसह साधी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित, शयन आसनी बस या सर्व सेवांसाठी प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील.

यापैकी कुठलाही पास तुम्हाला 10 दिवस अगोदरपर्यंत घेता येतो. आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेची पास नियमित बसेससोबतच कोणतेही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणार बसमध्येसुद्धा ग्राह्य आहे. 

पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बसमध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते. म्हणजे रिजर्वेशन चार्ज भरून सीट रिजर्व करता येते. 

पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत 30 किलो वजनाचे प्रवासी सामान आणि 12 वर्षाखालील मुलाला 15 किलो वजनाचे प्रवासी सामान घेऊन जाता येते. 

आता या पाससाठी किती पैसे भरावे लागतील? 

मित्रांनो, 4 ते 7 दिवसांसाठी मिळतो. साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगरीमध्ये. 

तसेच प्रौढ व्यक्ती आणि मुले दोघांसाठी पासचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. 

यामध्ये मुलांचे वय पाच वर्षाहून अधिक आणि 12 वर्षांपेक्षा कमी असायला हवे. 

सात दिवस म्हणजे लाल परी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती अंतरराज्य या पासकरिता प्रौढ व्यक्तीला जर सात दिवसांच्या पास पाहिजे असेल तर ₹2040 भरावे लागतील. 

मुलांसाठी सात दिवसांच्या पासला ₹1025 भरावे लागतील. 

त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर चार दिवसांचा पास काढायचा असेल तर ₹1170 आणि मुलांच्या पास साठी. ₹585 भरून पास मिळवता येतो. 

वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य
प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह २०४० १०२५ ११७० ५८५
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह ३०३० १५२० १५२० ७६५

Leave a Comment