Krushi Market

या योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणेः-

वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य
प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह २०४० १०२५ ११७० ५८५
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह ३०३० १५२० १५२० ७६५

 

 

MSRTC : अधिकृत वेबसाईट वर माहिती पहा 

लक्षात असू द्या जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही. किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही. त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे.

त्याचप्रमाणे पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा  पास जप्त होऊ शकतो. कारण पास नॉन ट्रान्स्फरेबल म्हणजे अहस्तांतरणीय आहे. 

प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळाची जबाबदारी घेत नाही. नातलगाचा मृत्यू, भूकंप आग लागणे, अतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पाससाठी भरलेले पैसे परत मिळवता येतात. 

परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पासमागे ₹20 सेवाशुल्क कापून घेतले जाते.