मोठा निर्णय – लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरु : प्रत्येक मुलीला 1 लाख रु. पहा अर्ज प्रक्रिया | Lek Ladaki Yojana Application Maharashtra

नमस्कार मित्रांनो इतर राज्याप्रमाणेच आता महाराष्ट्रात देखील लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana Application सुरू करण्यात आली आहे. या योजनेत  महाराष्ट्रातील मुलीला एक लाख रुपये चा लाभ मिळणार आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. 

लेक लाडकी योजनेच्या लाभ कोणत्या मुलींना मिळणारअर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत

लेक लाडकी योजना कुणासाठी ?

या योजनेत महाराष्ट्रात जन्म झालेल्या मुलीला 1 लाख रुपये पर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.  हे पैसे डीबीटी द्वारे डायरेक्ट मुलीच्या नावे उघडलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

मंत्रिमंडळ निर्णयानुसार लेक लाडकी योजनेमध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या प्रत्येक मुलीसाठी एक लाख रुपये पर्यंतचे लाभ दिला जाणार आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. 

अर्ज नमुना

ऑनलाईन डाऊनलोड येथे करा 

एक एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या प्रत्येक मुलीला एक लाख रुपये लाभ दिला जाईल परंतु एक एप्रिल 2023 नंतर दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर दोन जुळ्या मुली झाल्या तरी देखील त्या दोन्ही मुलींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाईल.

परंतु एक एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या किंवा यापूर्वी  दोन मुली असतील असतील व पुन्हा तिसरी मुलगी जन्माला आली तर या मुलीसाठी हा लाभ दिला जाणार नाही

लेक लाडकी योजनेसाठी नियम अटी

  • लेक लाडकी योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. 
  • दुसऱ्या वेळेस मुलगी जन्माला आल्यास आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गाव किंवा नगरपालिकेतील अंगणवाडी कडे अर्ज भरून द्यावा लागेल.  अंगणवाडी सेविका लेक लाडकी योजनेचा अर्ज तपासतील व वरिष्ठ कार्यालय कडे हा अर्ज पाठवतील.  त्यानंतर अर्जाची छाननी होऊन लाभार्थ्याला पैसे दिले जातील.

यापूर्वी सुरू असलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून लेक लाडकी योजना सुरू करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर लगेचच त्याची माहिती आमच्या या वेबसाईट वरती प्रकाशित केले जाईल. त्यामुळे आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आजच जॉईन व्हा.

Leave a Comment