जमीन खरेदी साठी १६ लाख रु. चे कर्ज  : जमीन खरेदी अनुदान योजना Land Purchase Grant

ऐकून नवल वाटेल परंतु मित्रांनो, शासनाकडून जमीन खरेदी अनुदान योजना (Land Purchase Grant) अशा प्रकारची योजना देखील राबवली जाते. ज्या लोकांकडे स्वतःची शेत जमीन नाही अशा लोकांसाठी शासनाकडून जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते.

तुम्हाला माहीतच आहे की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीमुळे लोकांकडे जमिनी कमी उरलेल्या आहेत. यातच काही  लोक भूमीहीन आहेत.

भारतात खूप ठिकाणी पडीक जमिनी देखील उपलब्ध आहेत.  गावोगावी गायरान जमिनी उपलब्ध आहेत परंतु या जमिनीवर शेती कोणी करत नाही.  त्यामुळे गायरान जमिनीवर शेती भूमिहीन लाभार्थ्याच्या नावावर करण्यासाठी शासनाकडून योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या जमीन खरेदी योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. या योजनेमध्ये शासनाने नुकतेच बदल केलेले आहेत.  आता लाभार्थ्याला जमीन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.

Land Purchase Grant : जमीन खरेदी योजनेत कोण पात्र आहेत ?

  • भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांना जमीन खरेदी योजनेचा लाभ दिला जातो.
  • लाभार्थ्याच्या नावावर यापूर्वी कुठलीही जमीन नसावी. 
  • लाभार्थी दारिद्र रेषेखालील असावा.

फक्त १०० रुपयात वडिलोपार्जित जमीन नावावर असा करा अर्ज  

जमीन खरेदी अनुदानासाठी अर्ज कुठे करावा

सामाजिक न्याय विभाग म्हणजेच समाज कल्याण विभागामध्ये जमीन खरेदी योजनेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. 

 

अर्ज नमुना येथे पहा 

Leave a Comment