तुम्ही कार्ड डाऊनलोड केले का ? – आयुष्मान कार्डची शेवटची मुदत | 5 लाख रु.च्या  मोफत उपचारापासून वंचित राहू शकता Ayushman Card Download Date

नमस्कार मित्रांनो भारत सरकारकडून आयुष्यमान भारत Ayushman Card Download योजना  सुरू करण्यात आलेली आहे. आयुष्मान भारत योजनेमधून नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत दिला जातो.

सामान्य नागरिकांना दवाखान्याचे येणारे मोठे बिल भरणे शक्य नसते. दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पैशांची आवश्यकता असते.  उपचाराअभावी  काही नागरिकांना आपले प्राण देखील गमावे लागतात. 

त्यामुळे आता भारत सरकारने आयुष्मान भारत योजना भारतातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. पूर्वी आयुष्मान भारत योजना फक्त त्याच लोकांसाठी होती ज्यांचे आयुष्यमान भारतच्या SECC डाटा लिस्ट मध्ये नाव होते. 

परंतु आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आता सर्वांचे  आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी आवश्यकता

  1. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  2. तसेच हे राशन कार्ड ऑनलाइन झालेले असणे आवश्यक आहे.
  3. तुमच्याकडे राशन कार्ड चा बारा अंकी ऑनलाइन नंबर असणे आवश्यक आहे.
  4. राशन कार्ड मधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड काढलेले असणे आवश्यक आहे.
  5. घरातील सर्व सदस्यांची नावे राशन कार्ड मध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे.
  6. ज्या सदस्याचे नाव राशन कार्ड मध्ये असेल त्याचेच आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येईल.

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून डाऊनलोड करू शकता.  तसेच तुम्ही आपल्या जवळील सीएससी सेंटर वरून देखील आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड  काढू शकता.

आयुष्मान कार्ड डाऊनलोड साठी येथे क्लिक करा 

आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढण्याची शेवटची मुदत

आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड तुम्ही कधीही काढू शकता.  परंतु शासन स्तरावरून आयुष्यमान भारत योजना राबवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे.  गावोगावी कॅम्प घेऊन आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढण्यात येत आहेत.

त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन काढून या वाहत्या जागेत आपले हात धुवून घ्यावे.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी पूर्वी 30 रुपये लागायचे.  सध्या आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड तुम्ही फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता.  भविष्यात कदाचित आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतील.

मोबाईल वरून आयुष्मान भारत कार्ड कसे  डाउनलोड करावे

आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढण्याची प्रक्रिया खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे.  तुमच्याकडे असलेल्या आधार कार्ड राशन कार्ड च्या माहितीसह तुम्ही आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.  खाली दिलेला यूट्यूब व्हिडिओ पहा

Leave a Comment