शेततळे अर्ज सुरु ७५००० रु. अनुदान : पाऊस पडण्यापूर्वी करा अर्ज : Farm Pond Application Maharashtra

By Krushi Market

Published on:

Farm Pond Application Maharashtra : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबर खालील बाबींना अनुदान मिळते. 

  • वैयक्तिक शेततळे, 
  • शेततळयाचे अस्तरीकरण, 
  • हरित गृह उभारणे 
  • शेडनेट हाऊस उभारणे 

या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू- धारक शेतकऱ्यांना ५५% आणि 

इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. 

सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना २५ % आणि इतर शेतकऱ्यांना ३०% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८०% व ७५% एकूण अनुदान देण्यात येते. 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.

शेततळे अर्ज येथे करा  

वित्त विभागाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता रु. ४००.०० कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करुन दिलेली आहे. 

सन २०२४-२५ मध्ये ४००.०० कोटी निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शासननिर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. 

Leave a Comment