तुमचा सिबिल स्कोर कमी आहे का ? असा वाढवा सिबिल स्कोर | Cibil Score Increase steps

आजच्या  काळात बँकेतील आर्थिक व्यवहार करण्यासाठी सिबिल स्कोर Cibil Score चांगला असणे गरजेचे आहे.  चांगल्या सिबिल स्कोर शिवाय कुठलीही बँक कर्ज देण्यास तयार होत नाही.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळे व्यवहार करत असतो. त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर होत असतो.  आपला सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी खालील गोष्टीचा अवलंब करा.

तुम्ही साधं कुठल्याही बँकेत लोन साठी अर्ज केला किंवा ऑनलाईन कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला तरी त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर होत असतो.

सिबिल स्कोर येथे चेक करा 

कर्जासाठी केलेली  चौकशी किंवा कर्ज प्रकरणासाठी अर्ज करून बँकेने तुमचे कर्ज प्रकरण नाकारणे याचा  परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर दिसून येतो.

सिबिल स्कोर Cibil Score चे खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते

 सिबिल स्कोर 300 ते 900 या आकडेवारी मध्ये मोजला जातो

  1.  एक ते तीनशेच्या दरम्यान असलेला सिबिल स्कोर हा सर्वात कमी स्कोर म्हणून गणला जातो. असा सिबिल स्कोर असेल तर कुठलीही बँक आपल्यास सहजासहजी कर्ज देण्यास तयार होत नाही.
  2.  300 ते 550 च्या दरम्यान असलेला सिबिल स्कोर हा मध्यम सिबिल स्कोर म्हणून गणला जातो परंतु आर्थिक व्यवहारासाठी किंवा कुठल्याही बँकेतील कर्ज प्रकरणासाठी हा सिविल स्कोर पुरेसा नाही.
  3.  साडेपाचशे ते साडेसातशे च्या दरम्यान असलेला सिबिल स्कोर हा चांगला  सिबिल स्कोर म्हणून गणला जातो या सिबिल स्कोर्स बँक तुम्हाला सहजपणे कर्ज देण्यास तयार होते.

 सिबिल स्कोर वाढवण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा Cibil Score Increase steps 

आपल्याकडे सध्या सुरू असलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरा.  कर्जाचा हप्ता जर पाहून झाला तर याचा सरळ परिणाम आपल्या सिबिल स्कोरवर दिसून येतो.

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या क्रेडिट कार्डचे लिमिट पूर्ण वापरणे याचा अर्थ देखील तुम्ही आर्थिकदृष्ट्या कंगाल आहात असा याचा अर्थ होतो. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर झटकन खाली जाऊ शकतो.

त्यामुळे क्रेडिट कार्डची संपूर्ण मर्यादा वापरणे योग्य नाही.

जर तुम्ही कुठल्याही कर्जदाराला जामीनदार म्हणून असाल व त्या कर्जदाराने बँकेचे कर्ज थकविले असेल तरी देखील त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होऊ शकतो.

 या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमचा सिबिल स्कोर कधीही कमी होणार नाही.

सिबिल स्कोर येथे चेक करा

Leave a Comment