घरकुल लाभार्थ्यांना डिसेंबर पर्यंत दिवाळी भेट : PMAY House new Lucky Draw

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेतून PMAY House new Lucky Draw दिवाळीपर्यंत लाभार्थ्यांना नवीन घरकुल त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत घराचा ताबा मिळेल PMAY House new Lucky Draw

राज्य शासनाकडून महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग अंतर्गत नागरिकांना PMAY House योजनेतून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. प्रधानमंत्री आवास योजनेतून  पिंपरी व आकुर्डी येथे सदनिका बांधून तयार आहेत मात्र लकी ड्रॉ न झाल्यामुळे लाभार्थ्यांना अद्याप त्यांची घरे मिळालेली नाही.

नविन PMAY यादी येथे पहा 

जवळपास 11000 नागरिकांनी या घरासाठी अर्ज केले आहेत परंतु अजून सोडत न झाल्यामुळे ते  प्रतीक्षेत आहेत. आता दिवाळीच्या तोंडावर नागरिकांकडून या पी एम ए वाय घरांच्या सोडतीची वाट पाहिली जात आहे.

आकुर्डी मध्ये 938 घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होत.  यामध्ये दहा हजार रुपये अनामत रक्कम व पाचशे रुपये नोंदणी शुल्क नागरिकांनी जमा केले आहेत.  आकुर्डी मधील हा गृहप्रकल्प रस्ते आरक्षणातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.

गृहनिर्माण प्रकल्पासाठी म्हणजेच म्हाडा अंतर्गत अर्ज केलेले लाभार्थ्यांना डिसेंबर पर्यंत त्यांच्या घराचा ताबा मिळू शकतो.  यासाठी अर्ज केलेला लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली जात आहे.

अपेक्षित वेळेमध्ये लकी ड्रॉ काढून नागरिकांना डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

 तसेच या व्यतिरिक्त लाभार्थ्यांना यानंतर आपल्या गृहप्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी देखील वेळ लागू शकतो त्यामुळे घराचा ताबा मिळण्यास नागरिकांना डिसेंबर नंतर जानेवारी महिना देखील उजाडू शकतो.

Leave a Comment