ट्रॅक्टर अनुदानात वाढ : 5 लाख रु सबसिडी साठी ऑनलाईन अर्ज करा – Tractor Anudan Online Application

Tractor Anudan Online Application process

  • ट्रॅक्टर व ईतर अवजारे योजनेसाठी अर्ज कसा करावा
  • अनुदान किती मिळते
  • कागदपत्रे कोणती लागतात
  • लाभार्थी निवड कशी केली जाते
  • लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य
  • लाभार्थी निवड झाल्यावर अवजारे खरेदी साठी मिळणारी पूर्वसंमती

ट्रॅक्टर व ईतर अवजारे योजनेसाठी अर्ज कसा करावा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी कृषी अवजरांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्याची लिंक सर्वात खाली देण्यात आली आहे. शेती विषयक सर्व प्रकाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करू शकतात. Tractor Anudan Online Application

अनुदान किती मिळते Tractor Anudan

पूर्वी ट्रॅक्टर साठी जास्तीत जास्त एक लाख 25 हजार रुपये पर्यंतचा अनुदान दिले जायचे.  परंतु आता ट्रॅक्टर अनुदानामध्ये वाढ करून 5 लाख रुपये पर्यंत अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी जाणार आहे. 

Tractor अवजारे अनुदान लिस्ट लिंक https://farmech.gov.in/New_Folder/Consolidated_permissible_subsidy.pdf

राज्य शासनाचे कृषी विभागाचे पत्र 

tractor subsidy Gr
tractor subsidy Gr

ट्रॅक्टर व ईतर कृषी अवजारासाठी 50 टक्के व 40 टक्के अनुदान मिळते. ज्यामध्ये अनू सूचित जाती व जमाती महिला शेतकरी तसेच अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गाच्या शेतकर्‍यांना 50 टक्के व ईतर शेतकर्‍यांना 40 टक्के अनुदान मिळते.

Tractor साठी  कागदपत्रे कोणती लागतात

याठिकाणी अर्ज करताना सर्वसाधारण प्रवर्गाच्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ( 7/12 ) 8 अ बँकेचे पासबुक , आधार कार्ड, इत्यादी कागदपत्रे लागतात तसेच जर ईतर प्रवर्गाच्या शेतकर्‍यांना जातीचे प्रमाणपत्र लागते. Tractor Anudan Online Application

लाभार्थी निवड कशी केली जाते

महाडीबीटी च्या पोर्टलवर शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याठिकाणी राज्य सरकारकडून ऑनलाईन लॉटरी काढली जाते. लॉटरी निघाल्यावर शेतकर्‍यांना त्यांची लॉटरी मध्ये निवड झाल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवला जातो.

लॉटरी लिस्ट येथे पहा

लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य

ऑनलाइन लॉटरी काढताना महिला शेतकरी यांना 3 टक्के, अपंग किंवा दिव्यांग शेतकर्‍यांना 3 अर्ज आरक्षित असतात परंतु त्यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात नसतील तर ईतर लाभर्थ्यांचा विचार केला जातो. तसेच अनुसूचीत जाती जमाती शेतकर्‍यांना त्यांच्या आरक्षणप्रमाणे लॉटरी मध्ये निवड केली जाते.

लाभार्थी निवड झाल्यावर अवजारे खरेदी साठी मिळणारी पूर्वसंमती

लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांना पूर्वसंमती पत्र मिळते ते पत्र त्यांना ऑनलाईन प्रिंट करता येते. पूर्वसंमती मिळाल्यानंनातर विहित मुदतीत शेतकर्‍यांनी अवजारे खरेदी करणे आवश्यक असते.

अर्ज कसा करावा त्याचा व्हिडीओ येथे पहा 

Leave a Comment