Rejected Insurance Claims मित्रांनो नमस्कार, राज्यातील या 3 जिल्ह्यांमधील पीक विम्याचे 1 लाख 10 हजार अर्ज रद्द झालेल्या आहेत. हे 3 जिल्हे कोणते..? कोणत्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज रद्द झालेले आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही कोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज यांचे रद्द करण्यात आले आहेत याचं कारण काय आहे लाभ मिळणार की नाही मिळणार या बाबाची माहिती पाहूयात.
मराठवाड्यामधील छत्रपती संभाजी नगर, जालना, आणि बीड या 3 जिल्ह्यांना पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 मध्ये पिक विमा उतरवणाऱ्या एकूण अर्जापैकी एक लाख दहा हजार 729 पिक विमा अर्ज रद्द करण्यात आलेत. पिक विमा कंपनीच्या वतीने कृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांमधील 2479 पिक विमा अर्ज आहेत.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 148, गंगापूर 104, कन्नड 68, खुलताबाद 457, पैठण 490, फुलंब्री 205, सिल्लोड 415, सोयगाव 328, तर वैजापूर 264 अर्ज रद्द आहेत.
📢 हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना ₹13,600 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर पहा जीआर
जालना जिल्ह्यांमधील 11,219 अर्ज रद्द करण्यात आले, त्यामध्ये ही माहिती समोर येत आहे. अंबड 91, बदनापूर 2752, भोकरदन 2263, घनसावंगी 48, जाफराबाद 597, जालन्यातील 2942, मंठा 2481, परतुर 65, अर्ज रद्दमध्ये समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 97011 अर्ज विमा अर्ज रद्द करण्यात आलेत, यामध्ये अंबाजोगाई 3529, आष्टी मधील 2643, बीड मधील 1023, धारूरमधील 1349, गेवराई 34,258 केजमधील 9651, माजलगाव मधील 4 हजार 544, परळीतील 11,142, पाटोद्यातील 3068, वडवणी तालुक्यातील 886 खरीप पिक विमा अर्ज रद्द चा समावेश आहे. या ठिकाणी अशी माहिती आहे धन्यवाद.