नमो चा पहिला हफ्ता चेक करा तुमच्या खात्यात आला का : NAMO shetakri first Installment Bank Credit Status

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासंघांनी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी 85 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता क्रेडिट करण्यात आला आहे.

 आता शेतकऱ्यांना केंद्राचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी क्रेडिट केले जाणार आह.

नमो शेतकरी पहिला हप्ता येथे चेक करा

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महा आयटी कडून नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी पात्र झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेची स्थिती पाहता येणार आहे.

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी करणे लाभार्थी स्थिती चेक करणे या गोष्टींसाठी स्वतंत्र पोर्टल राज्य शासनाकडून विकसित केले जाणार आहे.

Leave a Comment