सोयाबीन व मक्यासाठी ८० कोटी पीक विमा मंजूर : या जिल्ह्यातील ८८ हजार शेतकरी पात्र – Crop Wise Crop Insurance list 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन मका बाजरी Crop Wise Crop Insurance list या पिकांसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा बँक खात्यावर क्रेडिट केला जाणार आहे.

पिक विमा योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  जिल्ह्यातील  एक लाख 16 हजार शेतकऱ्यांपैकी 88 हजार 352 शेतकऱ्यांना सोयाबीन व मका पिकासाठी 80 कोटी पिक विमा मंजूर झाला आहे.

पीक विम्याची अग्रिम रक्कम  नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून वितरित करण्यात येणार होती.  परंतु पिक विमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे पिक विमा वाटपापूर्वी अपील दाखल केले होते.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या सुविधांचा लाभ येथे पहा 

या अपिलांच्या सुनावण्यामध्ये आयुक्तांनी पिक विमा कंपन्यांचे मुद्दे खोडून काढत शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.  त्यामुळे आता पिक विमा कंपन्यांना अखेर पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गवताने यांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिक विमा बाबत दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment