मोठा निर्णय : दुष्काळी तालुक्यातील कर्ज वसुली माफ होणार – Farmer Loan List

Loan List : कर्जमाफी नंतर अजूनही 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान याची शेतकरी वाट पाहत आहे. अशातच राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये कमी पाऊस पडल्याने राज्यातील काही भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळी तालुक्यातील कर्ज वसुलीला स्थगिती :  पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश

राज्यात खरीप 2023 मध्ये कमी पाऊस पडल्याने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्ज वसुली  सक्तीने करण्यात येऊ नये याबाबत बँकांना सूचना देण्यात आले आहेत.

 नव्याने दुष्काळ जाहीर  झालेले तालुके

 येथे पहा 

राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थी शेतक-यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणा-या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आलीआहे. 

राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच अशी महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

Leave a Comment