यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू ! चला बघूया तालुक्यानुसार वितरित केलेली रक्कम !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, राज्यांमध्ये झालेल्या जून जुलै ऑगस्ट मधील अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसानात झालेले होते. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचे पिके हे पाण्यातच होत होते. वेळोवेळी शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून योग्य ते नियोजन शेतकरी करत होते, मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे यासोबतच कापसाला सुद्धा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस मोठ्या प्रमाणावर केला. पण हे पिके अतिवृष्टीमुळे धुवून गेली आणि पाण्याखालीच गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले.

परिणामी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता हे नुकसान झाल्याबद्दल नुकसानीच्या अंतिम अहवाल हा शेतकऱ्यांनी शासनाला पाठवला. शेवटी शेतकऱ्यांची आता एकच आशा होती ती म्हणजे शासनातर्फे काहीतरी नुकसान भरपाई मिळावी. जेणेकरून आम्हाला पुढील वाटचालीस पाऊल टाकायला अडचण येणार नाही.

त्या अहवालानुसार शासनाने जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त करून दिलेला असून आता शासनाच्या अंतर्गत तो निधी वितरित सुद्धा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण थोडक्यात निर्माण झाले आहे.

तर शेतकरी मित्रांनो जून पासून ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या अतिवृष्टी मुळे जे कोणी शेतकरी बाधित झाले होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन मदत देणार आहे. शासनाने 134 कोटी 29 लाख रुपयांच्या निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला आहे आणि आता लवकरात लवकर तो निधी वितरित करण्यात येईल.

तर शेतकरी मित्रांनो सध्या तरी या निधीचे वितरण तालुकास्तरावरती करण्याचे काम सुरू आहे. 66% मदत वितरण ही शासनामार्फत करण्यात आलेले आहे. तर आता जाणून घेऊया कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती निधी वाटप केलेला आहे.

तालुक्यानुसार निधी वाटप माहिती खालील प्रमाणे.

Compensation Distribution for crop damage;-

मित्रांनो सादर निधीचे वाटप चालू असून तीन नोव्हेंबर पर्यंत जवळपास 1 लाख 20 हजार 188 शेतकऱ्यांपैकी 87 हजार 59 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत जमा झालेली आहे.

तालुका निहाय रक्कम खालील प्रमाणे आहे

• अकोला तालुका – २१ हजार ५४६ शेतकरी – २२ कोटी ७८ लाख निधी

• बार्शी टाकळी तालुका – १० हजार ५३३ शेतकरी – ४ कोटी ९८ लाख ८ हजार निधी

• अकोट तालुका – १२ हजार ४५८ शेतकरी – १४ कोटी ९९ लाख निधी

• तेल्हारा तालुका – 3 हजार ४५२ शेतकरी – २ कोटी ९ लाख २८ हजार निधी

• बाळापुर तालुका – ३४ हजार ५६९ शेतकरी – ४१ कोटी २ लाख ९८ हजार रुपये

• मुर्तीजापूर तालुका – ४ हजार ५०१ शेतकरी – २ कोटी ८१ लाख ४२ हजार

• पातुर तालुका – ४९ शेतकरी – 3 लाख ३४ हजार रुपये

शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सर्व मिळून 87 हजार शेतकऱ्यांना जवळपास 88 कोटी 59 लाख रुपयांच्या निधी वाटप करण्यात आलेला आहे. यासोबतच अजूनही अकोला जिल्ह्यांमधील 33000 शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही, त्यामुळे ते शेतकरी निधीच्या प्रतीक्षेतच आहेत.

शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या.

https://pmfby.gov.in/

Leave a Comment