शासन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणार असून, या योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल; चला बघूया संपूर्ण कृषी बातमी !

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शेती करण्याकरिता जमीन, पाणी आणि वीज ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र तसे बघायचे झाले तर भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना अजून पुरेपूर वीज शेती करण्याकरिता उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी समोर सामोरे जावे लागते. राज्यामधील शेतकऱ्यांना वीज ही बहुतांशपणे रात्रीच दिली जात आहे आणि त्यात विजेची वेळ सुद्धा कमी केली आहे. मात्र आता राज्य शासनाने शेतकरी बांधवांना दिवसा बारा तासाची वीज उपलब्ध करून आम्ही देऊ, असे आश्वासन दिलेले आहे.

ह्या योजनांच्या माध्यमातून विजेची निर्मिती केली जाईल.

सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री यांनी असे आश्वासन शेतकऱ्यांना दिलेले असून ते शेतकरी बांधवांना असे सांगत आहेत की, आपल्या शासनाच्या माध्यमातून खास शेतकरी बांधवांना 12 तास वीज उपलब्ध करून द्यायची आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर फिटर योजनेच्या माध्यमातून या सोबतच पंतप्रधान कुसुम योजना या माध्यमातून विजेची निर्मिती केली जाईल. मुख्यमंत्री सौर फिडर योजना ही शासकीय योजना 2018 मध्ये सुरू केलेली होती. मात्र काही कारणांमुळे ही योजना बंद झाली. पण आता पुन्हा नव्याने आम्ही ती योजना सुरू करत आहोत.

शेतकऱ्यांना दिवसात 12 तास वीज शासन या दोन्ही योजनेच्या माध्यमातून देणार असून दरम्यानच्या काळात सौर फीडर वर वीज निर्मिती करण्यासाठी जागेची कमतरता होती. मात्र आता त्यावर चांगला पर्याय शोधून काढला आहे. वीज निर्मिती करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेतले आहेत. याकरिता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मागे 75 हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील.

निश्चितपणे शेतकरी बंधू-भगिनींना शेतीपंप चालवण्याकरिता दिवसाच्या वेळी बारा तास वीज उपलब्ध झाली तर खरोखर शेतकरी बांधवांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढेल व त्यांची धावपळ कमी होईल. यासोबतच अनेक विविध समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. मित्रांनो खरोखर चांगले उत्पादन काढण्याकरिता यासोबतच यशस्वीरित्या शेती करण्याकरिता शेतीला पुरेपूर विजेची गरज असणे आवश्यक आहे. मात्र अजूनही पुरेपूर विज शेतकरी बांधवांना उपलब्ध होत नाही.

मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी बांधवांना दिवसाच्या वेळी बारा तास वीज उपलब्ध करून आम्ही देऊ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच विजेचा प्रश्न हा मिटू शकतो. मात्र उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन नक्की कधी अमलात होते ह्या गोष्टीकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

Leave a Comment