रेशन धान्य ऐवजी रोख पैसे मिळणार : हा अर्ज भरून द्या cash Transfer of Food Subsidy   

cash Transfer of Food Subsidy : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना 

योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रक्कमेत सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत:-

एप्रिल, २०२४ पासून प्रति माह प्रति लाभार्थी ₹१७०/- इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरीत केली जाणर आहे. 

पात्रता : १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी 

या योजनेत समाविष्ट जिल्हे : 

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशीव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा 

योजनेसाठी अर्ज नमुना 

येथे डाउनलोड करा 

१४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण (Direct Benefit Transfer- DBT) योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यप्रणाली (Standard Operating Procedure- SOP) तसेच इतर सर्वसाधारण सूचना दि. २८ फेब्रुवारी, २०२३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. 

सदर शासन निर्णयातील प्रमाणभूत कार्यप्रणाली (Standard Operating Procedure- SOP) तसेच इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील.

सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २१२ / व्यय – १०, दि.२४.०५.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

१४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल, २०२४ पासून प्रति माह प्रति लाभार्थी ₹१७०/- इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्यात यावी.

Leave a Comment