31 मार्चपर्यंत 10 लाख घरकुल मंजूर : PM आवास व राज्य पुरस्कृत योजनांची घरकुल यादी पहा : PM Awas Yojana List PDF Download

घरकुल योजनेच्या यादीमध्ये प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.  घरकुल यादी मध्ये नाव समाविष्ट असलेल्या व अद्याप घरकुल न मिळालेल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

31 मार्च पूर्वी दहा लाख घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. पीएम आवास योजना (PM Awas Yojana List PDF) व राज्यातील इतर आवास योजना या सर्वांचे मिळून दहा लाख घरकुलांना मंजुरी दिली जाणार आहे.

राज्यात महाअवास  अभियान पुन्हा सुरू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सूचना  दिल्या आहेत. शासन स्तरावरील माहितीनुसार आता राज्यात 31 मार्च 2024 पूर्वी दहा लाख घरकुलांची निर्मिती होणार आहे.

 घरकुल यादी येथे पहा

राज्यात विविध आवास योजना,  गृहनिर्माण योजना,  पीएम आवास  व इतर सर्व योजनांचे मिळून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

दहा लाख घरकुल मंजूर करण्यासाठी लाभार्थी यादी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.  यादीमध्ये पात्र असलेल्या लोकांना 31 मार्चपूर्वी घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीएम आवास योजनेची घरकुल यादी पाहण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवर ही यादी मोफत डाउनलोड करता येते. 

राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध आवास योजना

  • प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण  
  • रमाई आवास योजना 
  • शबरी आवास योजना 
  • पारधी आवास योजना 
  • आवास योजना
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
  • मोदी आवास घरकुल योजना 

वरील सर्व आवास योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना 100% घरकुल मंजूर केले जाणार आहे. गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी, डेमो हाऊसचा प्रभावी वापर करून घरकुलांना मंजुरी दिली जाणार आहे.

10 rupee coin News

Leave a Comment