Ladaki Bahin Beneficiary Verifivation : लाडक्या बहिणींना एप्रिल पासून 2100 रुपये सुरू होण्याची शक्यता राज्य शासनाकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये आता लाडक्या बहिणींची पडताळणी होऊ शकते.
लाडकी बहिणीच्या वेळेस महिलांनी जे शपथपत्र भरून दिले होते त्यामध्ये भरपूर अटी होत्या.
त्यामुळे खालील निकषांची पडताळणी होऊ शकते.
राज्याचा अर्थसंकल्प एप्रिलमध्ये सुरू केला जाईल त्यानंतर लाडक्या बहिणींना निधीची तरतूद केली जाणार आहे.
या अगोदर लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना मिळाले आहेत.
लाडक्या बहिणीचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये प्रमाणे पैसे शासनाकडून जमा करण्यात आले आहेत.
आता डिसेंबर चा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
‘या’ निकषांची होणार पडताळणी…
- योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
- लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
- एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
परितक्त्या, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?