संपूर्ण कर्जमाफी : या शेतकऱ्यांची Karj Mafi Yojana For Farmers

By Krushi Market

Published on:

sanpurn karjmafi

Karj Mafi Yojana For Farmers : राज्यात मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सरकार आले आहे.
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासन याप्रमाणे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते ?

कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते हे समजून घेण्यासाठी : आतापर्यंत राबविलेल्या कर्जमाफी योजना समजून घेणे आवश्यक आहे.

  •  राज्यात फडणवीस सरकारने 2017 साली कर्जमाफी योजना राबवली होती.
  • या कर्जमाफी योजनेचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७
  • या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते.

 

 

  • तसेच नियमित कर्जा शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान देण्याचे घोषणा देखील करण्यात आली होती.
  • परंतु नियमित कर्जावर शेतकऱ्यांपैकी बरेच शेतकरी अजूनही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत.

आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो ?

महाराष्ट्रात कमी जमीन असलेले शेतकरी खूप आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी गरजेची असते. कारण हे शेतकरी जमीन गहाण ठेवतात.

कर्जबाजारीपणा, पिकांना भाव न मिळणं यामुळे या शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत असतं. परिणामी त्यांच्या जमिनीवरचा बोजा सातत्यानं वाढत जातो. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्त्वाची ठरते.

या परिस्थितीचा विचार करता नियमित कर्जदार व थकीत कर्जदार या सर्वांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

परंतु जर पुन्हा फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चुकीचा मेसेज जाईल.

त्यामुळे सरसकट संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाऊ शकतो.

Leave a Comment