या बाजारपेठेमध्ये कांदा गेला चार हजार रुपयांवर; चला बघूया आजचे कांद्याचे बाजार भाव;

मागील काही दिवसांपासूनच कांद्याच्या बाजार भाव मध्ये वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तसे पाहायला गेले तर शेतकरी बांधवांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा सध्या संपत आलेला आहे. यासोबतच नवीन लाल कांदा देखील बाजारामधून अजून मोठ्या प्रमाणावर ती दाखल झालेला नाही.

अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे शॉर्टेज बाजारपेठेमध्ये झाले आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. दरम्यानच्या काळात कांद्या च्या बाजारभावाकडे बघायचे झाले तर प्रतिक्विंटल तीन हजार रुपये असा बाजार भाव कांद्याला मिळत आहे.

याशिवाय आज कांद्याला प्रतिक्विंटल मागे चार हजार रुपये देखील भाव मिळत आहे. यामुळे निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाची झलक दिसत आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव दिला जात आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न घालवता जाणून घ्या राज्यामधील कांद्याचे बाजार भाव.

१) राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :-

ह्या बाजार समितीमध्ये 1964 क्विंटल कांद्याची आवक झालेली असून ह्या बाजार समितीमध्ये कांद्या ला किमान बाजार भाव 700 रुपये प्रतिक्विंटल आणि साडेतीन हजार रुपये कमाल बाजार भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. यासोबतच या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण भाव हा 2650 रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे.

२) जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :-

आज जुन्नर मध्ये बघायचे झाले तर सर्वोत्कृष्ट भाव कांद्याला मिळत आहे. या ठिकाणी कांद्याची आवक ही 8144 क्विंटल इतकी झाली आहे. आज त्या ठिकाणी झालेल्या लिलावामध्ये किमान बाजार भाव 2000 रुपये आणि कमाल बाजार भाव चार हजार रुपये. असं मिळालेला असून या बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे.

३) अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती :-

अकलूजच्या बाजारपेठेमध्ये आज 325 क्विंटल कांद्याचे आवक झालेली असून या बाजारपेठेमध्ये झालेल्या लीलाव्यात कांद्याला सहाशे रुपये किमान बाजार भाव प्रतिक्विंटल मागे मिळालेला असून साडेतीन हजार रुपये कमाल भाव प्रतिक्विंटल मागे मिळालेला आहे. त्यासोबतच आज झालेल्या लीलाव्यामध्ये अडीच हजार रुपये प्रति क्विंटल मागे सर्वसाधारण भाव मिळालेला आहे.

४) पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :-

पुण्याच्या बाजार समितीमध्ये आज 14 हजार 274 क्विंटल लोकल कांद्याची आवक झालेली असून या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलाव्यात कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल मागे किमान भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रति क्विंटल मागे कमाल भाव मिळाला आहे. या ठिकाणी सर्वसाधारण भावा दोन हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे.

५) पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या बाजारपेठेमध्ये आज 503 क्विंटल कांद्याची आवक झालेली असून या ठिकाणी झालेल्या लीलाव्यात किमान बाजारभाव सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल बाजारभाव अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल मिळालेला असून सर्वसाधारण बाजारभाव सोळाशे रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे.

Leave a Comment