Flour Mill and Sewing machine PDF : प्रत्येक जिल्हा परिषदे कडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामध्ये दरवर्षी महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो.
सध्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पिठाची गिरणी व पिको फॉल मशीन साठी बुलढाणा जिल्ह्यातील अर्ज सुरू आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी
- 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत
योजनेसाठी कोण पात्र आहेत
- ग्रामीण भागातील महिला व मुली.
- पिठाच्या गिरणीसाठी Flour Mill फक्त अपंग महिला व मुलींनाच अर्ज करता येईल.
- पिको फॉल Sewing machine मशीनसाठी महिला व मुली दोन्ही अर्ज करू शकतात.
योजनेसाठी नियम व अटी
- अर्जदार महिला किंवा मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे.
- अर्जासोबत उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- अर्जदार महिला किंवा मुलगी ही ग्रामीण भागातील असावी.
- लाभार्थी चे वय किमान 17 व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे
- यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
- मुदतीत अर्ज सादर करावा.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- अर्जदाराच्या वयाचा दाखला / TC
- अर्जदाराचे किंवा त्याच्या पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड सत्यप्रत
- बँक पासबुक झेरॉक्स
- लाईट बिल