उद्यापासून पिक विमा खात्यात जमा होण्यास सुरवात : Crop Insurance Credit

Crop Insurance Credit : शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास Crop Insurance Credit सुरुवात होत आहे. यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड तपशील एकत्र केले जाणार आहे.

प्रभावी पिक विमा वाटपासाठी व पिक विमा सबसिडीचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी शासनाकडून व्यवस्थित प्रक्रिया येत आहे. 

लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज व्हेरिफाय करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पीक विम्याचे अर्ज वेरिफाय झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा क्रेडिट केला जात आहे.

ऐन दिवाळीत पिक जमा होणार

पिक विमा मिळण्यासाठी पिक विमा कंपनीकडून 25% अग्रिम पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

25% अग्रिम पिक विम्यासाठी शासनाकडून पिक विमा कंपनीस निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील हे स्पष्ट झाले  आहे.

राज्यात जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाच्या खंडामुळे बाधित झालेल्या महसूल मंडळात पीक विम्याची अग्रिम 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल. तसेच अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देखील पिक विम्याची 25% अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार.

पिक विमा जिल्हा निहाय स्थिती येथे पहा 

25% अग्रीम पिक विमा साठी पात्र शेतकरी

पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम ही त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ज्या शेतकऱ्यांचे महसूल मंडळे पिक विमा साठी पात्र ठरले आहेत. राज्यातील ज्या भागात अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड असेल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25% पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असेल अशा सर्व महसूल मंडळांमध्ये दिवाळीपूर्वी पीक विमा खात्यात जमा केला जाईल.

Leave a Comment