Crop Insurance : पिक विमा योजनेत बदल करून शासनाकडून शेतकऱ्यांचे प्रीमियम भरण्यासाठी 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
शासन स्तरावर दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला दिलेला आहे. या बदल्यात पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना 1.50 हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.
शासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत शेतकरी ने भरलेल्या प्रेमियमच्या पाचपट पिक विमा भरपाई देण्यात आलेली आहे. परंतु पिक विमा कंपन्यांना प्रत्यक्षात पिक विमा योजनेतून किती फायदा झाला हे शासनाने स्पष्ट केलेले नाही.
अशातच खरीप 2023 पासून एक रुपयात पिक विमा योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या पोटी फक्त एक रुपया पिक विमा कंपनीकडे भरायचा आहे.
उर्वरित प्रीमियम ची रक्कम शासनाकडून पिक विमा कंपनीला दिली जाईल. पिक विमा कंपनीची तिजोरी जनतेच्या पैशातून भरली जाईल.
पिक विमा च्या नुकसानेपोटी भरपाई म्हणून शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जाते. यातच काही शेतकऱ्यांचे बरेच पिक विमा क्लेम पिक विमा कंपनीकडून नाकारले जातात.
नुकसान भरपाई देण्याच्या वेळेला पिक विमा कंपनी कोर्टात अपील करते. शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी जमेल तेवढी टाळाटाळ केली जाते.
पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यासाठी वेळ काढू का केला जातो. शासनाकडून मिळालेल्या विमा हप्त्याचे पैसे हे जनतेचे पैसे आहेत. वेळेवर पिक विमा वाटप न करून शेतकऱ्यांचे हाल वर्षानुवर्ष होत आलेले आहेत.