मराठी तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Loan Scheme

मराठी तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.  यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज योजना प्रक्रिया Annasaheb Patil Loan Scheme आज आपण समजून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज | Annasaheb Patil Karj Yojana Maharashtra

व्यवसाय उभे करण्यासाठी भांडवल देखील लागते. तर तुम्ही बेरोजगार असाल तर आता मात्र काळजी करण्याची गरज नाही. यासंदर्भातील माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना माहिती Annasaheb Patil Loan Scheme

Annasaheb Patil Loan Scheme ही योजना मराठा तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज देत आहे ते पण बिनव्याजी कर्ज देत आहे. या बिनव्याजी कर्जासाठी महास्वयंम वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी

येथे अर्ज करा 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठीऑनलाईन अर्ज  प्रक्रिया

ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, पात्रता काय आहे, किती लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते व मंडळ किती वर्ष व्याज भरू शकते अशी सर्व माहिती आपण जाणून घेऊया. (annasaheb patil karj yojana maharashtra)

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल असणं आवश्यक आहे. अनेक तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचण येते. तर आता तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मार्फत तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड (दोन्ही बाजूने मागून आणि पुढून)
  • रहिवासी पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • प्रकल्प अर्ज
  • तर इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करता वेळी अपलोड करण्यासाठी आवश्यक आहेत. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • पुरुषांसाठी जास्तीत जास्त 50 वर्षं महिलांसाठी जास्तीत जास्त 55 वर्षं वयोमर्यादा आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी 8 लाखांपर्यंत उत्पन्न असणे आवश्यक आहे.
  • 5 वर्षांकरिता किंवा किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल तितक्या वर्षापर्यंत लाभ मिळेल.
  • कर्ज मर्यादा रक्कम 15 लक्ष असेल आणि व्याजाचा दर द.सा.द.शे. 12 टक्के एवढा असेल आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येईल.
  • लाभार्थ्यांने व्यवसाय सुरू केल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुमच्या व्यवसायाचे दोन फोटो वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या मार्फत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केल्यामुळे आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करत आहे त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नावाने बोर्ड लावणे आवश्यक आहे. (annasaheb patil karj yojana online apply)

Leave a Comment