Saur Krushi Pump Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना आता सौर पंपासाठी सरकार इतक्या लाखांचं अनुदान या ठिकाणी देणार आहे तर हे अनुदान कोणाला मिळणार ? यासाठी काय पात्रता, अर्ज प्रक्रिया, आणि या संदर्भातील संपूर्ण A to Z माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
शेतीसाठी पाणी उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये विजेच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचन त्यांच्या पिकांकरिता करता येत नाही, आणि याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सौर पंप योजना सुरू केली आहेत.
Saur Krushi Pump Yojana कोण अर्ज करू शकता?
मागेल त्याला सौर पंप योजनेतून लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अटी/शर्ती ही खालील प्रमाणे आहे.
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी / अधिकृत शेतकरी असणे आवश्यक
- शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 आणि 8अ उतारा असणे आवश्यक
- शेतकऱ्यांकडे वीज जोडणी नाही किंवा अपुरी अशा शेतकऱ्यांना प्राधान्य
- शेतजमीन सिंचन योग्य असावी
- पाणी उपलब्धतेसाठी विहीर किंवा बोरवेल आवश्यक