देशातील नागरिकांनी देशाच्या आर्थिक रचनेमध्ये सहभागी व्हावे यासोबतच त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनधन खाती सुरू करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेच्या खात्या मधून आत्तापर्यंत 25 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केले आहेत. म्हणजेच देशात या योजनेच्या लाभार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्याकडे जर जनधन बँक खाते असेल किंवा नसेल तरी तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.
देशामधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स यांचे ऑनलाइन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी जळगाव येथे सर्व नागरिकांना संबोधित केले होते या कार्यक्रमांमध्ये ते असे म्हणाले की विविध कल्याणकारी योजना यासोबतच सबसिडी लाभार्थ्यांना दिली जाईल. योजना व सबसिडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील इतकेच नाही तर जवळपास 50 कोटी जनधन खत्या पैकी निम्मी खाते महिलांचेच आहेत अशा प्रकारे ह्या जनधन खात्यामध्ये महिला सुद्धा लाभ घेण्यासाठी पाऊल उचलत आहेत.
जनधन खात्याची सध्याची स्थिती –
सध्या गरीब वर्गीय नागरिकांच्या जनधन बँक अकाउंट मध्ये 1.75 लाख कोटी रुपये इतकी रक्कम जमा आहे. जनधन बँकेतील खाते उघडताना लोक प्रश्न उपस्थित करत होते की आपल्या देशामध्ये याची खरोखर गरज आहे की नाही? आज आम्ही जनधन खात्यात द्वारे गरीब व गरजू लोकांसाठी विविध कल्याणकारी उपाययोजना राबवून 25 लाख कोटी रुपये पर्यंत रक्कम वितरित केली आहे आणि ही एक सर्वात मोठी रक्कम आहे असे केंद्रीय मंत्री रेड्डी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये पीएम मोदींनी युनिट्सचं केलं उदघाटन –
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे एकाच वेळी उद्घाटन केले ते पण ऑनलाईन पद्धतीने. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे काश्मीरमधील व जम्मू मधील दोन डिजिटल बँक युनिटचे उद्घाटन सुद्धा केले आहे. यानंतर तुम्हाला सेविंग अकाउंट उघडण्याकरिता, पासबुक प्रिंट करण्याकरिता, एफडी मध्ये गुंतवणूक करण्याकरिता, या सोबतच कर्जासाठी अर्ज करण्याकरिता, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा अर्ज करण्याकरिता, बँकेमध्ये फेरी मारण्याची गरज नाही. आता तुमच्या जवळपास ही उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून केंद्र शासन सर्व नागरिकांना हवी तशी मदत पुरवत आहे.
- आजपासून पुढील एवढ्या दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार; IMD चा इशारा Havaman Andaj Today
- Saur Krushi Pump Yojna : मुख्यमंत्र्यांची सौर कृषी पंप योजनेत केली ही मोठी घोषणा शेतकरी झाले खुश
- Jivant Satbara Mohim : सर्व मयत खातेदारांच्या 7/12 वरील वारसांच्या नोंदीसाठी मोहीम; आला शासन निर्णय
- Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला आणखी 523 किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग; कसा असणार रूट?
- Dakh Havaman Andaz : बापरे आजपासून पुढचे एवढे दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता पंजाब डख यांचा अंदाज जारी