महाराष्ट्र राज्य शासनाची कॅबिनेट बैठक दि.17.11.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन , या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध महत्वपुर्ण 15 निर्णय घेण्यात आले आहेत . यापैकी शेतकऱ्यांच्या बाबत एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे , शेतकऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आलेला महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
बाजार समितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना लढवता येणार निवडणुक –
बाजार समिती मध्ये आता सर्वसामान्य शेतकरी देखिल निवडणुक लढवू शकणार आहेत , या संदर्भात कृषी उत्पन्न पणन अधिनियमा मध्ये सुधारणा करणेबाबत मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे .या निर्णातील सुधारणामुळे आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडणुक लढवुन प्रतिनिधीत्व त्याचबरोबर प्रत्यक्ष सहभाग वाढविता येणार आहे .कृषी उत्पन्न पणन अधिनियमाच्या 13 ( 1 ) अ या कलमामध्ये सुधारणा करण्यात येत असल्याने , बाजार समितींच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना निवडणुकीचा अधिकार मिळणार आहे .
या कलामातील सुधारणामुळे कृषी पतसंस्था व बहु उद्देशिय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखिल कृषी उत्पन्न समितीची निवडणुक लढविता येणार आहे .या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार मिळणार असल्याने , शेतकऱ्यांना मोठा लाभ प्राप्त होणार आहे .
- 2025 च्या नवीन घरकुल याद्या या ठिकाणी पहा New Gharkul List Download in Mobile
- भांडी संच वाटप अर्ज सुरु : बांधकाम कामगार नोंदणी : Bandhkam Kamgar Yojana
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी): तुमच्या स्वप्नातील घरासाठी अर्ज कसा कराल? PM Awaas 2.0
- आजपासून पुढील एवढ्या दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार; IMD चा इशारा Havaman Andaj Today
- Saur Krushi Pump Yojna : मुख्यमंत्र्यांची सौर कृषी पंप योजनेत केली ही मोठी घोषणा शेतकरी झाले खुश