Maha DBT :  पाईप लाईन व मोटर इंजिन योजना Pipe Line Online Apply

Pipe Line Online Apply : शेतकऱ्यांसाठी राबवली  जाणारी एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे पाईपलाइन तसेच डिझेल पंप अनुदान योजना या बाबत सविस्तर माहिती

योजनेच्या अनुदान करीता ऑनलाईन पद्धतीने

  •   अर्ज कसा करायचा ?
  •   योजनेअंतर्गत दिला जाणारे अनुदान किती ?
  •   या मध्ये लाभार्थी होण्यासाठी अटी, शर्ती पात्रतेचे निकष,  काय आहेत ?

या सर्वांबद्दल ची सविस्तर माहिती

अर्ज कसा करायचा ?

महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवर  शेतकर्‍यांसाठी वेगवेगळ्या योजनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कोरडवाहू क्षेत्र विकास व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ही योजना राबविली जाते. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वेबसाइट लिंक सर्वात खाली दिली आहे.  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇👇

👉👉येथे क्लिक करा👈👈

योजनेअंतर्गत दिला जाणारे अनुदान किती ?

योजनेच्या अंतर्गत  पीव्हीसी पाईप व एचडीपी  पाईप साठी अनुदान दिले जाते. यामध्ये  50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते.

त्याच्या मध्ये एचडीपी पाईप साठी पन्नास रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते   

पिवहीसी पाईपसाठी  35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते.

या मध्ये लाभार्थी होण्यासाठी अटी, शर्ती पात्रतेचे निकष,  काय आहेत ?

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्यासाठी शेतकर्‍याकडे सातबारा आधार कार्ड ईत्यादी माहिती द्यावी लागते. यामध्ये शेतकर्‍याकडे सिंचनासाठी कोणती साधने उपलब्ध आहे याची माहिती भरावी लागते. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यावर लॉटरी पद्धतीने शेतकर्‍यांची निवड केली जाते. निवड झालेल्या शेतकर्‍यांना मोबाईलवर मॅसेजद्वारे सूचना दिली जाते.

Leave a Comment