New Expressway तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, महाराष्ट्रातील या 2 शहरांमध्ये नवीन ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा तयार केला जाणार आहे. यासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्प तयार केला जाणार आहे, आणि यासाठी गेल्या 2 वर्षापासून हा प्रकल्पला आता मंजुरी मिळालेली आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर आता नाशिक मधील कृषी बाजारपेठ आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. तरी या रस्त्यासाठी सरकारने आता भूसंपादनाचे अधिसूचना जारी केली, प्रकल्पाचे कामाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे.
New Expressway 2025
महाराष्ट्रातील हा 134 किलोमीटरचा नवीन मार्ग असणार आहे. या प्रक्रियेला मंजूर मिळवल्याने हा भूप्रदेशात महामार्ग प्रदेशात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोमवारी 134 किलोमीटर लांबीच्या हरित महामार्गामुळे पावसाचा आता प्रवासाचा वेळ अधिक दोन ते अडीच तासावरती आणला आहे.
📢 हे पण वाचा :- आता शेतकऱ्यांना बोअरवेल घेण्यासाठी थेट 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू
यामुळे मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असं बोलले जात आहे. नाशिक मधील कृषी बाजारपेठ व पुण्यातील अधिक औद्योगिक कंपन्या या एक्सप्रेस वे चा नक्कीच फायदा होणार आहे.
नाशिकच्या आणि पुणे जिल्ह्याच्या एकूण विकासाला चालना देखील मिळणार आहे. या महामार्गासाठी एकूण पंधराशे पंचवीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रकल्पासाठी सुमारे 15,696 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असं सांगण्यात आलं आहेत.
पुणे आणि नाशिक दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असून देखील विकासाला मोठी चालना मिळणारे असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि लवकरच कामाला सुरुवात होईल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जाईल. राज्य शासनाने घेतलेला निर्णय पुणे आणि नाशिक मधील जनतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे धन्यवाद.
1 thought on “महाराष्ट्रातील या दोन शहरांदरम्यान तयार होणार 134 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे भूसंपादन अधिसूचना जारी : New Expressway”