Lek Ladaki Scheme application PDf Form : लेक लाडकी योजनेसाठी अर्ज नमुना, पात्रता, अर्ज प्रक्रिया, लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Lek Ladaki PDf Form) या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत.
लेक लाडकी योजनेत किती रुपये लाभ मिळणार
- पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीसाठी ही योजना आहे.
- मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळणार.
- इयत्ता पहिली मध्ये गेल्यावर सहा हजार रुपये.
- सहावीत गेल्यावर सात हजार रुपये.
- अकरावीत आठ हजार रुपये
- लाभार्थी मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तिला 75 हजार रुपये
लेक लाडकी योजनेसाठी येथे अर्ज करा
याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला.
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र ( एक लाख रुपये पेक्षा कमी )
- मातापित्याचे आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी )
- मतदान ओळखपत्र मुलगी 18 वर्षे झाल्यानंतर
- मुलगी 18 वर्षे झाल्यानंतर शाळेत शिकत असल्याबाबतचा दाखला (प्रवेश निर्गम)
- कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभार्थी करता मुलीचा विवाह झाल्या नसल्याचे स्वयंघोषणापत्र
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता
- लेक लाडकी योजना ही पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारकांसाठी आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थ्याला महाराष्ट्रात बँक खाते उघडावे लागेल.
- लेक लाडकी योजनेसाठी एक एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या एक अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- लाभार्थ्याला दुसऱ्या आपत्यानंतर किंवा दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जुळी झाल्यास कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल.
लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे भरावा
लेक लाडकी योजनेसाठी आपल्या अंगणवाडीमध्ये अर्ज भरून द्यावा लागेल. त्यानंतर या अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलीच्या नावे बँक खात्यात किंवा सुरुवातीला लाभार्थीच्या माता पित्या पैकी कुणाच्यातरी एका बँक खात्यात पैसे येतील.
लेक लाडकी पीडीएफ अर्ज नमुना येथे डाऊनलोड करा