Land record maharashtra online : कोणतेही शुल्क न भरता वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर कशी करावी. बहुतेक लोकांना वडिलोपार्जित जमीन अथवा इतर संपत्ती स्वतःच्या नावावर करायचे असते.
याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
जमीन नावावर करण्यासाठी तलाठ्याला पैसे देण्याऐवजी तुम्ही खालील प्रक्रियांचा अवलंब करू शकता.
जमीन नावावर करण्यसाठी लोकांची अडवणूक केली जाते व पैसे घेऊन या प्रक्रिया राबविल्या जातात. मित्रांनो वडिलोपार्जित जमीन नावावर करण्याच्या तीन पद्धती आहेत.
जमीन नावावर करण्याच्या पद्धती Land Record Online Process
- महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार
- दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप
- दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करून
यामध्ये पहिली पद्धत सर्वात सोपी आहे. पहिल्या पद्धतीनुसार व फक्त 100 रुपयांध्ये जमीनीचे वाटप केले जाते.
मित्रांनो वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी अथवा सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाच्या पायऱ्या जी जाण्याची गरज नाही.
सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे.
कुटुंबातील जमिनीचे वाटप करण्यासाठी अथवा मयताच्या वारसदारांची नावे बारा उताऱ्यावर लावण्याची ही एक सोपी पद्धत आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ती जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करू शकतात.