land map Calculation : आता भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून ही मोजणी पद्धत सुरू करण्यात आली आहे. जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज देखील भरता येईल.
- जमीन मोजणी अर्ज पद्धत
- जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क
- जमीन मोजण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित
जमीन मोजण्याची वाढती मागणी ध्यानात घेऊन राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने आता ई मोजणीची नवीन पद्धत सुरू केलेली आहे. आता तुम्हाला जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागांमध्ये हेलपाटी मारण्याची गरज नाही.
भूमी अभिलेख विभागाकडून ई मोजणी नावाचे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. आपल्या शेताच्या बांधाबद्दल व सीमेबद्दल जर तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही जमीन मोजण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
शासकीय जमीन मोजणी अर्ज येथे करा
आज सगळीकडेच शहरीकरण होत आहेत अगदी छोट्या-छोट्या गाव खेड्यामध्ये देखील प्लॉटिंग व शहरीकरण सुरू झालेले आहे.
रस्ते व महामार्गामुळे गाव खेड्यांना शहराचे रूप आल्यामुळे गावातील जमिनीचा भाव वाढला आहे. अशातच जमिनीचे योग्य मोजमाप न झाल्याने नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात. यासाठी आता ऑनलाइन ई-मोजणी नावाचा पोर्टल भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.
शासकीय जमीन मोजण्यासाठी लागणारे शुल्क भरून तुम्ही जमीन मोजणी करून घेऊ शकता.
या व्यतिरिक्त जमीन मोजण्याचे वेगवेगळे पर्याय नागरिकांसमोर उपलब्ध आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जमीन मोजणीसाठी तुम्ही गुगल मॅप चा वापर करू शकता. तसेच प्ले स्टोअर वरती लँड मॅप कॅल्क्युलेटर चे विविध ॲप उपलब्ध आहेत.