Onion:- आता रब्बी मध्येही पिकणार कांदा जोमाने पहा उत्पादन वाढीची सूत्रे 2022.

राज्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड होत असते. रब्बी हंगामातील कांद्यासाठी एन-2-4-1′ ही जात निवडली जाते व ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादन (350-450 क्विं./हे.) क्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक (6-8 महिने) क्षमतेसाठी चांगली मानली जाते. या प्रकारचा कांदा हा मध्यम चपटगोल आकाराचा असून त्यामध्ये डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी प्रकार घडून येतात. शेतकरी स्वतः या जातीचे बीजोत्पादन देखील करत असतात ……

व्यवस्थापनाची सूत्रे

१) नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दर्जेदार रोपांची लागवड करावी आणि लागवड 15 डिसेंबरच्या आत पूर्ण करावे.
२) लागवड करताना उत्तम निचाऱ्याची मध्यम खोल जमिनीची निवड करावी तसेच विशेषतः सपाट वाफ्यात रोपांची कोरड्या जमिनीवर 15×10 से. मी. या अंतरावर दाट लागवड करण्यात यावी. त्यानंतर पाणी द्यावे आणि न चुकता नागे भरवण्यात यावी.
३) लागवडीनंतर एका आठवड्यात शिफारशीत तणनाशक फवारणी, गरजेनुसार एका महिन्यानंतर हातखोरपणे आणि त्यानंतर नत्र खताचा वापर दर आठवड्याला देण्यात यावा.
४) लागवडीनंतर 10, 25, 40 व 52 दिवसांनी नियमितपणे कीड रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीटकनाशक फवारण्यात यावी.
५) लागवडीनंतर 55 दिवसापर्यंत आठ ते दहा दिवसांच्या अंतराने नेहमीच पाण्याचे व्यवस्थापन करावे आणि लागवडीत उत्तर 90 दिवसांनी कांद्याचे पाणी बंद करावे.
६) लागवडीनंतर 110 ते 115 दिवसानंतर या जातीची पाठ नैसर्गिक रित्या पडायला सुरुवात होते. कांद्याच्या मानाने 50 टक्के नैसर्गिक रित्या कांद्याची पात पडल्यानंतर काढणे करून घ्यावी. कांद्याची पात न कापता पातीसकट कांदा वाफ यातून उपटून घ्यावा अशा रीतीने कांद्याची काढणी करावी आणि तो पसरून ठेवावा अशा रीतीने पसरून ठेवावा की एका कांद्याचा गोठ दुसऱ्याच्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल. कांद्याची पात शेतामध्ये दिसते पाच दिवसांकरिता वाढवावी आणि त्यानंतर वाळलेल्या कांद्याच्या पाच बोटा पासून एक इंच अंतराची मान वळून पिळा देऊन कापावी. त्यानंतर कांदा हा झाडाच्या अथवा चपराच्या सावलीत तीन आठवड्यांचा कालावधीसाठी पातळ थरात वाढवावा आणि या काळात कांद्यातील उष्णतामुळे बाहेरून पत्ते सुटते आणि आकर्षक रंग येतो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी सडलेले व मोड आलेले कांदे व्यवस्थित निवडून फेकून द्यावे.
७) त्यानंतर कांदा स्टोरेजला ठेवावा स्टोरेज मध्ये मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावे तसेच करण्यासाठी दोन दिवस आधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी त्यासाठी मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करण्यात यावी.
८) साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सोडण्याचे प्रमाण फारच कमी राहते व त्यामुळे कांद्याची क्वालिटी व तो जास्त काळ टिकतो. पावसाळी वातावरणामध्ये स्टोरेजच्या तळाशी गंधकाची धुर देण्याने कांदा सोडत नाही आणि स्टोरेज मध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरील पत्ती काढू नये यामुळे कांद्याला भाव मिळत नाही. कांद्याची पत्ती संरक्षणाचे काम करत असल्याने त्याचे जतन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठवल्यास हा कांदा सहा ते आठ महिने उत्तमरीत्या टिकतो…..

बीजोत्पादन करताना ….

१) 15 नोव्हेंबर पर्यंत अजिबात न मोड आलेल्या कांद्याची गोट निवडून लाल कांद्याच्या बीजोत्पादन क्षेत्रापासून सुरक्षित विलनीकरण अंतरावर साधारण साधारण 1.5 कि. मी. दूर घ्यावे जेणेकरून कांद्याची जैविक शुद्धता कायम राखली जाईल.
२) साधारण दर तीन वर्षानंतर कांद्याचे उत्पादकता विकृतीची प्रकार क्षमता तसेच साठवणूक क्षमतेने घट झाल्यास कृषी विद्यापीठातून चांगल्या या जातीचे मूलभूत बियाणे घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित उत्पादन घ्यावे जेणेकरून तुम्हाला त्यापासून चांगले उत्पादन मिळेल…..

कमी उत्पादकता –

१) रोपांची लागवड ही ओल्यात आणि दीर्घ अंतरावरती केली जाते. रोपांची लागवड उशिरा 15 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत होते. लागवडीनंतर 45 ते 60 दिवस साधारण ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फुल किडे व करपा प्रादुर्भाव दिसून येतो.
२) कांदा पोसण्याच्या काळात लागवडीनंतर 60 ते 90 दिवस नियमितपणे आठ ते दहा दिवसांच्या दरम्यान पाणी द्यावे. पाण्याचा ताण बसल्यानंतर एकदम भरपूर पाणी दिले जाते तसेच फेब्रुवारी मार्च दरम्यान शित लहरी मुळे मोठ्या प्रमाणात डोंगळे येतात…..

उत्तम दर्जाचे उत्पादन व साठवणूक क्षमता

निचरा न होणान्या भारी जमिनीत लागवड, असंतुलित रसायनिक खतांचा वापर, भरखते देताना नत्र खताचा अति प्रमाणात वापर, लागवडीनंतर 60-65 दिवसांच्या नंतर कांदा पोसण्याच्या कालावधीत नत्र खतांचा वापर कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी न सोडणे कांदा काढणीनंतर लगेच कांद्याची पात कापून कांदा पसरून टाकने……

सावलीत कांदे तीन आठवडे कांदे न वाळवता,
प्रतवारी न करता, उष्ण कांदे स्टोरेज मध्ये भरणे, कांदा स्टोरेज मध्ये भरण्याआधी प्रत्येक महिन्यात मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी न करणे, साठवणगृहाची रुंदी चार फुटापेक्षा तर उंची पाच फुटापेक्षा जास्त असणे आवश्यक असते……

साठवणगृहाच्या छपरांची उंची साठवलेल्या कांद्यापेक्षा तीन फुटापेक्षा कमी अंतरावर असणे तसेच साठवणगृहाची उंची जागेवर नसणे व त्याच्या पाया सिमेंटचा अथवा कडक जमीन नसणे आणि साठवणगृहाच्या कप्प्याचे उंची जमिनीपासून दोन फूट नसल्यामुळे तळाला हवा खेळते राहत नाही. यामुळे कांदा खराब होऊ शकतो……

कांदा शेतीमधील काही आव्हाने ज्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे….

कांदा हे वातावरणात संवेदनशील असणारे पीक आहे. बदलत्या हवामानामुळे कांद्यावर विपरीत प्रकारचे परिणाम होत असतात……

१) वाढीव तापमान पाणीटंचाई गारपीट व वादळी पाऊस यांच्यापासून बचाव करून जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रामुख्याने कांद्याची लागवड रब्बी हंगामात करतात तसेच बीजोत्पादनासाठी गोठ लागवड 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत पूर्ण करावी…..
२) बदलत्या हवामानामुळे कमी कालावधीचा आणि लवकर तयार होणारा कांद्याच्या जातीची निवड करावी….
३) राज्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र लक्षणीयरित्या कमी झालेले दिसते. पांढऱ्या कांद्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहोरी यांनी विकसित केलेली फुले सफेद ही जात योग्य मानली जाते मात्र ही जात ही रब्बी हंगामातील उसाचे व कांद्याचे योग्य पीक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे…..
४) सिंचनाचा वापर करावा जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि सुधारित कांदा चाळीसा वापर करावा…..

लागवड क्षेत्र

१) कांदा पिकवणाऱ्या राज्यातील क्षेत्रांनी उत्पादन या दोन्हींमध्ये महाराष्ट्र कर्नाटक गुजरात व आंध्र प्रदेश ही काही राज्य आघाडीवर आहेत…..
२) देशाचे 25 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर ,धुळे हे जिल्हे कांदा पिकवण्यात अग्रेसर आहेत.
महाराष्ट्रातील 37 टक्के तर देशातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन हे फक्त नाशिक जिल्ह्यात होत आहे……

Leave a Comment