E pik pahani App Download Version 2  : ई – पिक पाहणी अँप चे नवीन व्हर्जन

ई – पिक पाहणी अँप चे नवीन व्हर्जन आले आहे. यावर्षीच्या खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोर वरून ई – पिक पाहणी चे नवीन ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. E pik pahani App Download

 ह्या ॲपच्या मदतीने आपल्या शेतात पेरलेली पिके यांची ऑनलाईन सातबारा रेकॉर्डवर नोंद करावी.  ई – पिक पाहणी app च्या मदतीने आपल्या शेतात असलेली वेगवेगळी पिके व त्यांची क्षेत्र यांची नोंद सातबारावर करण्याची सोय करण्यात आली आहे.

येथे क्लिक करून डाऊनलोड करा 

ई – पिक पाहणी ॲप मोबाईलवर डाऊनलोड केल्यावर आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी येईल.ई – पिक पाहणी ॲप मध्ये मोबाईल नंबर व चार अंकी पिन किंवा पासवर्ड टाकून लॉगिन करता येईल. 

ई – पिक पाहणी app सुरू झाल्यावर त्यामध्ये आपले सातबारा वरील क्षेत्र, गट नंबर, 8 अ खाते नंबर निवडून ई – पिक पाहणी करून घ्यावी.

ई – पिक पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढावा लागेल.  आपल्या शेतात पेरलेल्या  पिकाचे लोकेशन घेतले जाईल. यासाठी सुरुवातीला आपल्या मोबाईलचे लोकेशन सुरू करावे लागेल. 

यानंतर ऑनलाईन पिकाचे लोकेशन सेव होईल.  ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ई – पिक पाहणी ॲप मध्ये सबमिट या बटनावर क्लिक करावे. 

सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या सातबारावर आपण पेरलेल्या पिकाची नोंद होईल.  शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी ई – पिक पाहणी  करणे बंधनकारक आहे.

 तसेच जर तुम्ही तुमच्या पिकाचा पिक विमा काढला असेल.  व भविष्यात तुमच्या पिकाची काही नुकसान झाले तर पिक विमा कंपनीकडून पिक विमा मिळण्यासाठी आपल्या पिकाची ई – पिक पाहणी ॲप द्वारे सातबारावर पिकाची नोंद झालेली असणे आवश्यक आहे.

Leave a Comment