Vihir Anudan Scheme उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही जुन्या आणि नवीन विहिरीचे बांधकाम करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी शासनाच्या अनुदान योजनेची माहिती घेऊन आलेलो आहे. जुन्या व नवीन विहीरीसाठी आता अनुदान दिले जात आहे.
जुन्या आणि नवीन विहिरींसाठी अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते. आणि अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत ही विहीर त्यांना मिळते. आता प्रत्यक्षात ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबवली जाते, लाभार्थ्यांसाठी अनुदान समाज कल्याण विभागात दिल्या जाते.
Vihir Anudan Scheme 2025
या योजनेतून बऱ्याच विहिरी खोदल्या जात असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. विहिरीचे कामे उन्हाळ्यातच का केले जातात .? तर पावसामुळे चिखल आणि पाण्यामुळे विहिरीचे काम करता येत नाही यासाठी उन्हाळ्यामध्ये विहिरीचे काम केले जाते.
त्यामुळे शासनाकडून अनुदान मिळते आहे, तर एका लाभार्थी शेतकऱ्याला किती रुपये अनुदान मिळतं.? नवीन विहिरींसाठी अडीच लाख जुनी विहिरींसाठी पन्नास हजार रुपये अनुदान मिळत असतं.
महाडीबीटी फार्मर स्कीम पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
हे पण वाचा :- आली पोस्टाची जबरदस्त योजना : महिन्याला 5000 गुंतवा अन् 8 लाख मिळवा पण कसे वाचा..?
शेतकरी हा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे
सक्षम प्राधिकरण दिले जातीचा दाखला
नवीन विहिरीसाठी कमीत कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक
त्या शेतकऱ्याचे नावे सातबारा उतारा 8 अ उतारा
विहिरी शिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे जमीन असणे आवश्यक
बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत
आधार कार्ड
वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आतील आवश्यक
योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती, अथवा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत जाऊन त्या ठिकाणी माहिती मिळवू शकता. किंवा ऑनलाईन देखील प्रक्रिया अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सुरू आहे. आता यासाठी लाभ घेण्याकरिता उमेदवारांकडे दोन पर्याय असून ते ऑफलाइन आणि ऑनलाईन आहेत धन्यवाद.