नमो शेतकरीच्या अंतिम याद्या तयार Namo Shetkari First Installment beneficiary List
महाआयटी कडून पीएम किसान प्रमाणेच एक नवीन पोर्टल सुरू करण्यात येत आहे. घोषणा होऊन देखील अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नव्हते. कारण महाआयटी कडून शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्यास वेळ लागला होता.
आता या नवीन पोर्टलवर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या याद्या पाहता येईल. तसेच लाभार्थी स्थिती देखील चेक करता येईल
पात्रता याद्या येथे पाहता येईल
85 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वर्ग केला जाणार आहे. गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे.
माहे एप्रिल ते जून या कालावधी साठी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता साठी शासनाकडून 1720 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये