कृषी अवजारे अर्ज प्रक्रिया : ९० टक्के अनुदानावर ताडपत्री व ईतर अवजारे ZP Agricultural Equipment

By Krushi Market

Published on:

ZP Agricultural Equipment : कृषी अवजारांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी अर्ज भरवण्यात येत असतात.  यामध्ये रोटावेटर, चाप कटर मशीन, ताडपत्री, तीन एचपी, पाच एचपी मोटर इत्यादी वस्तूंचे वाटप केले जाते.

ZP Yojana: हे सर्व अर्ज जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत मागविले जातात.  या कृषी साहित्याचा लाभ घेण्यासाठी पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर करावयाचा असतो.

सध्या नांदेड जिल्हा परिषदेकडून खालील घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • ताडपत्री
  • तीन एचपी पाच एचपी चे ओपन वेल सबमर्सिबल पंप संच
  • पावर ऑपरेटेड चाफ कटर
  • ट्रॅक्टर चलीत रोटावेटर

जिल्हा परिषदेच्या विविध योजना

येथे पहा 

इत्यादी वस्तू पंचायत समिती स्तरावर देण्याचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ZP Yojana: जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून सर्वसाधारण शेतक-यांना ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री देण्यात येणार असून, पात्र व्यक्तींनी दि. 25 june पूर्वी पंचायत समितीत गट विकास अधिका-यांकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही योजना सर्व संवर्गातील शेतक-यांसाठी खुली आहे. योजनेत ४५० जीएसएम व सहा बाय सहा मीटर लांबीची ताडपत्री ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. ईतर अवजारे ५० टक्के अनुदानावर मिळतील. 

अर्जदाराकडे सदर जिल्ह्यात स्वत:च्या मालकीची जमीन असावी. अर्जासह चालू वर्षाचा स्वत:चा डिजीटल (क्यू आर कोड) असलेला तलाठी यांचा सातबारा जोडावा.

अर्जदाराने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. अर्जदार दिव्यांग असल्यास तसे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. केवायसी झालेल्या बँकेच्या पासबुकाचे पहिल्या पान, आधारकार्ड यांच्या झेरॉक्स, तसेच कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) यांचे शिफारसपत्र अर्जाला जोडावे, असे आवाहन जिल्हा कृषीविकास अधिका-यांनी केले आहे.

Leave a Comment