खरीपासाठी ई पिक पाहणीचे नवीन ॲप  डाऊनलोड करा E pik pahani new App Download 

By Krushi Market

Published on:

यावर्षी खरीप हंगाम 2024 साठी ई – पिक पाहणी चे नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे.  आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पेरलेल्या पिकांची ई – पिक पाहणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.

यावर्षीच्या खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोर वरून ई – पिक पाहणी चे नवीन ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. E pik pahani App Download

या ई पीक पाहणी ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या सातबारावरील पिकाची नोंद घरबसल्या करता येणार आहे.

 आपल्या सातबारावर पिकाची नोंद झाल्यामुळे आपणास पीक विमा व शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम मिळणे सोपे होणार आहे.

 शासन निर्णयानुसार ईपीक पाहणी केली नाही तर पिक विमा व नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात.

 त्यामुळे ई पिक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

येथे क्लिक करून डाऊनलोड करा 

ई – पिक पाहणी app सुरू झाल्यावर त्यामध्ये आपले सातबारा वरील क्षेत्र, गट नंबर, 8 अ खाते नंबर निवडून ई – पिक पाहणी करून घ्यावी.

ई – पिक पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढावा लागेल.  आपल्या शेतात पेरलेल्या  पिकाचे लोकेशन घेतले जाईल. यासाठी सुरुवातीला आपल्या मोबाईलचे लोकेशन सुरू करावे लागेल. 

यानंतर ऑनलाईन पिकाचे लोकेशन सेव होईल.  ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ई – पिक पाहणी ॲप मध्ये सबमिट या बटनावर क्लिक करावे. 

सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या सातबारावर आपण पेरलेल्या पिकाची नोंद होईल.  शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी ई – पिक पाहणी  करणे बंधनकारक आहे.

Leave a Comment