विवाह नोंद अशी करा : कागदपत्रे व PDF अर्ज नमुना – विवाह प्रमाणपत्र PDF डाऊनलोड करा 

By Krushi Market

Published on:

विवाह नोंद अर्ज नमुना PDF

मित्रांनो विवाह नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. विवाह नंतर नावांमध्ये बदल करणे व विवाह प्रमाणपत्र डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

विवाह प्रमाणपत्र हा एक कायदेशीर पुरावा आहे.

विवाह नोंदणी कधी करावी

  • विवाह झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत विहित नमुन्यात विवाह नोंदणी करता येईल.
  •  विवाह नोंदणीचा निश्चित कालावधी संपल्यावर देखील विवाह नोंदणी करता येते.
  •  मुदतीनंतर विवाह नोंदणी केल्यास विवाह नोंदणीसाठी अधिकचे शुल्क भरावे लागेल.

 विवाह नोंदणी प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे

  • वधू व वर यांचे ओळखपत्र जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी
  • वधू व वर दोघांचा वयाचा पुरावा जसे की जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, टी.सी इत्यादी
  • राहण्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा  जसे की राशन कार्ड, विज बिल, टेलीफोन बिल. पासपोर्ट इत्यादी
  • लग्नपत्रिका – लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर शपथपत्र
  • वधू व वर यांचे प्रत्येकी पाच पासपोर्ट साईज फोटो
  • तीन साक्षीदारांचे प्रत्येकी दोन फोटो
  • साक्षीदारांचे आधार कार्ड झेरॉक्स किंवा ओळखपत्र झेरॉक्स
  • लग्नप्रसंगीचे फोटोग्राफ्स  वधू व वर दोघांचे 
  • वधू व वर यापैकी कोणीही एखादी व्यक्ती घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाच्या आदेशाची प्रत
  • वधू किंवा वर यापैकी एखादी व्यक्ती विधवा किंवा विधुर असल्यास पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्र PDF अर्ज नमुना 

येथे डाऊनलोड करा

 विवाह प्रमाणपत्रासाठी आवश्यक शुल्क

  • विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसात नोंदणी केली तर 50 रुपये
  • विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यानंतर 90 दिवसानंतर परंतु एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोंदणी 100 रुपये
  • विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यानंतर एक वर्षाहून अधिक कालावधी झाल्यास विवाह नोंदणी 200रुपये
  • विवाह नोंदणी अर्ज तपासण्यासाठी सोबत घ्यावयाचे शुल्क 15 रुपये
  • विवाह प्रमाणपत्र शुल्क वीस रुपये

विवाह नोंदणी कोठे करावी

 विवाह नोंदणी तुम्ही  तुमच्या हद्दीतील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे करू शकता.  विवाह नोंदणी वधू किंवा वर दोन्हीपैकी कोणत्याही एकाच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये केली जाऊ शकते.

विवाह नोंदणी केल्यानंतर सात दिवसाच्या आत ग्रामपंचायत स्तरावरून विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.

Leave a Comment