मुख्यमंत्री योजना दूत भरती : ५० हजार पदे पगार 10 हजार रु. | Yojana Dut Bharti Apply Online

Yojana Dut Bharti Apply Online : राज्यात  मोठी भरती केली जाणार आहे.  यामध्ये पन्नास हजार पदे उपलब्ध आहेत.  मुख्यमंत्री योजना दूत  या पदांसाठी राज्यात पन्नास हजार पदे भरली जाणार आहेत.

  • अर्ज कसा करावा
  • पगार किती असेल
  • निवड प्रक्रिया कशी असेल
  • कामाचे स्वरूप काय असेल

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५०,००० योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.

योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. 

तसेच, योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री योजना दूत भरती निवड प्रक्रिया कशी असेल

  1.  ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
  2. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
  3. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.

 

मुख्यमंत्री योजना दूत भरती : आवश्यक कागदपत्रे

  1.  आधारकार्ड.
  2.  पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
  3. अधिवासाचा दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला)
  4. वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
  5. पासपोर्ट साईज फोटो.
  6.  हमीपत्र.(ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)

मुख्यमंत्री योजना दूत च्या निवडीसाठी पात्रतेचे निकष :- 

  1. वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
  2. शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. 
  3. संगणक ज्ञान आवश्यक .
  4. उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
  5. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
  6. उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

मुख्यमंत्री योजना दूत GR येथे पहा 

Leave a Comment