Yojana Dut Bharti Apply Online : राज्यात मोठी भरती केली जाणार आहे. यामध्ये पन्नास हजार पदे उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री योजना दूत या पदांसाठी राज्यात पन्नास हजार पदे भरली जाणार आहेत.
- अर्ज कसा करावा
- पगार किती असेल
- निवड प्रक्रिया कशी असेल
- कामाचे स्वरूप काय असेल
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५०,००० योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे.
तसेच, योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योजना दूत भरती निवड प्रक्रिया कशी असेल
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
- मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
- निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
मुख्यमंत्री योजना दूत भरती : आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड.
- पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
- अधिवासाचा दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला)
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
- पासपोर्ट साईज फोटो.
- हमीपत्र.(ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
मुख्यमंत्री योजना दूत च्या निवडीसाठी पात्रतेचे निकष :-
- वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
- शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
- संगणक ज्ञान आवश्यक .
- उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
- उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.