Yojana Doot Bharati Online Apply : महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत नावाचे पद निर्माण करण्यात आले आहे.
Yojana Doot उमेदवाराची निवड कशी केली जाणार
- वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार
- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा
- उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक
- उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
- उमेदवाराचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक.
- योजना दूत ऑनलाइन अर्ज कुठे करावा
Yojana Doot Bharati Online Apply
योजना दूत ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. https://mahayojanadoot.org/register?userType=youth या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
योजना दूत यांना पगार किती असेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे मानधन दिले जाणार आहे.
हे मानधन उमेदवाराच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाईल.
योजना दूताचे काम काय असेल ?
योजना दूध हा सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.
सरकारच्या ध्येयधोरणांचा व कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्याचं काम योजना दूताचे असेल.
योजना दूताचा कालावधी किती असेल ?
योजना दूताचा कालावधी सहा महिन्यासाठी असेल. योजना दूत हे पद कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यासाठी भरले जाणार आहे.
अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करून ठेवा.