नमस्कार मैत्रिणींनो उज्वला गॅस योजनेचे ऑनलाइन अर्ज सध्या सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून महिलांसाठी (Ujjwala Gas Online Apply) ऑनलाईन अर्ज करता येईल.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून कोणकोणत्या गोष्टी मिळणार ते खाली दिलेले आहे.
फक्त 100 रुपयांमध्ये खालील गोष्टी उज्वला गॅस योजनेतून मिळतात
- एक गॅस सिलेंडर (गॅस टाकी)
- गॅस स्टोव्ह (शेगडी)
- नळी
- रेग्युलेटर
- लाईटर
- इत्यादी
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून अर्ज केल्यानंतर सुरुवातीला एक गॅस सिलेंडर मिळते. हे गॅस सिलेंडर पूर्ण भरलेले असते. सुरुवातीला मिळालेल्या एक गॅस सिलेंडरचे रूपांतर तुम्ही दोन गॅस सिलेंडर मध्ये करू शकता.
उज्वला गॅस योजनेसाठी कोण अर्ज करू शकते ?
उज्वला गॅस योजनेसाठी कुटुंबातील महिलेच्या नावाने ऑनलाईन अर्ज करता येईल. महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असावे.
उज्वला गॅस योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- महिलेच्या नावाचे आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- महिलेचे ज्या राशन कार्ड मध्ये नाव आहे ते राशन कार्ड
- रेशन कार्ड चा ऑनलाईन नंबर
- रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड नंबर
वरील कागदपत्रे स्कॅन करून जेपीजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागतील.
ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याबाबत यूट्यूब चैनल वरती व्हिडिओ बनवलेला आहे