Tukadebandi Low For Land : तुकडे बंदी कायद्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे. 14 मार्च 2024 रोजी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून नवीन नियमावली जोडण्यात आली आहे.
आता नागरिकांना काही विशिष्ट कारणांसाठी एक दोन गुंठा जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे.
तुकडेबंदी कायद्यानुसार बागायती जमिनीसाठी कमीत कमी दहा गुंठे जमीन व जिरायती क्षेत्रासाठी कमीत कमी वीस गुंठे क्षेत्रापर्यंत खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतात.
परंतु नागरिकांना विहीर खोदण्यासाठी घर बांधण्यासाठी किंवा क्षेत्र रस्ता मिळवण्यासाठी एक दोन गुंठा जमीन खरेदी विक्रीसाठी अडचणी निर्माण होत होत्या.
यावर उपाय म्हणून तुकडेबंदी काळजामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता नागरिक खालील कारणांसाठी एक दोन गुंठा जमीन खरेदी विक्री करू शकता.
- विहीर खोदणे
- शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करणे
- शेतात घरकुल बांधण्यासाठी
अशा प्रकारचे एक दोन गुंठा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांची मंजुरी घ्यावी लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी आदेश आल्यानंतर अशा प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार करता येईल.
त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.
सविस्तर राजपत्र लिंक व त्यासोबत सर्वात खाली दिलेल्या पेजवर अर्ज नमुना आहे.